हिंदु धर्माचे अद्वितीयत्व दर्शवणारे वास्तव !

‘बहुतांशी अन्य पंथीय पैशांची लालूच दाखवून, कपटाने किंवा बळजबरीने हिंदूंना आपल्या पंथात ओढतात; मात्र हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेचे महत्त्व कळल्यावर सुजाण अन्य पंथीय हिंदु धर्माचे पालन करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

‘भारतातील हिंदू स्वतःचे आणि सरकार हिंदूंचे रक्षण करू शकत नाहीत. असे हिंदू आणि सरकार पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंचे कधी रक्षण करू शकेल का ? हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आजारावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठी उपाय करणे आवश्यक, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासनकर्ते !

‘लहानपणापासून सात्त्विकता वाढवणारी साधना न शिकवल्याने सर्वत्र भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, खून इत्यादी वाढले आहेत, हेही सरकारला कळत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनाे, हे लक्षात घ्या !

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली राजकारण्याविषयी कुणी अर्वाच्च बोलू शकत नाही; पण देवतांविषयी बोलतात ! आपल्याला हे पालटायचे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, धर्मातील वर्णांचे महत्त्व लक्षात घ्या !

‘हिंदु धर्मात चार वर्ण आहेत. त्यावर टीका करतांना बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि इतर धर्मियांना कळत नाही की, सर्वच क्षेत्रांत तसे आहे. साधनेच्या संदर्भात इतके भेद असणे, हे हिंदु धर्माचे अद्वितीयत्व दर्शवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पारतंत्र्याचा लज्जास्पद इतिहास पुसा !

‘हिंदूंनो, गेल्या ९०० वर्षांच्या पारतंत्र्याचा लज्जास्पद इतिहास पुसण्यासाठी आता जागृत व्हा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्मविहीन ‍विज्ञानाचे मूल्य शून्य !

‘मानवाला साधना आणि अध्यात्म न शिकवता त्याला ‘सुखी जीवन जगता यावे’, यासाठी विविध उपकरणे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केवळ यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा !

‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे आणि जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतरच राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

असे झाल्यास आश्चर्य वाटायला नको !

‘काश्मीरनंतर भारतातील ज्या ज्या गावांत धर्मांध बहुसंख्य आहेत, त्यांनी ‘आम्हाला पाकिस्तानशी जोडा’, अशी मागणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कोणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांबरोबर दुरावा, भांडण होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले