धर्मशिक्षणाच्या अभावी आत्मघात करून घेणारे हिंदू !

‘धर्मशिक्षणामुळे धर्मासाठी त्याग करण्यास लाखो मुसलमान सिद्ध असतात, तर हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते बुद्धीप्रामाण्यवादी होऊन धर्माला खोटे ठरवतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेमुळेच आनंदप्राप्ती होते !

‘बहुतांशी अन्य पंथीय पैशांची लालूच दाखवून, कपटाने किंवा बळजोरीने हिंदूंना त्यांच्या पंथात ओढतात; मात्र हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेने आनंदप्राप्ती होत असल्याने तिचे महत्त्व कळल्यावर सुजाण अन्य पंथीय हे हिंदु धर्माचे पालन करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केवळ प्रवचने नकोत, तर हेही करा !

‘रामायण, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींवर केवळ प्रवचने नकोत, तर वानरसेना, मावळे सिद्ध करायला हवेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्वच क्षेत्रांमधील अधोगती, ही अहिंसावादी महात्मा गांधी आणि काँग्रेस यांची भारताला देणगी !

‘भारतापासून पाकिस्तान आणि बांगलादेश स्वतंत्र होणे, भारतातील धर्मांधांनी ‘काश्मीर पाकिस्तानचा आहे’, असे म्हणणे आणि भारतात सर्वत्र आतंकवादी असणे, ही अहिंसावादी महात्मा गांधी आणि काँग्रेस यांची भारताला देणगी आहे. त्या विचारसरणींना हरवून हिंदु राष्ट्राची स्थापना केल्यावरच भारताची सर्वच क्षेत्रांत प्रगती होईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संत आणि राजकारणी यांच्यातील भेद !

‘राजकारण्यांना पैसे देऊन कार्यकर्ते जमवावे लागतात, तर संतांकडे त्यांना अर्पण देणारे कार्यकर्ते, म्हणजे साधक आणि शिष्य असतात.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माकडे इतर धर्मीय आकर्षित होण्यामागील कारण !

‘इतर धर्म भीती अथवा लालूच दाखवून परधर्मियांना आपल्या धर्मात खेचतात, तर हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेमुळे आनंदप्राप्ती होत असल्याने इतर धर्मीय हिंदु धर्माकडे आपोआप आकर्षित होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केवळ यानेच राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल !

‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे अन् जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतर राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देशप्रेम म्हणजे सावरकर !

‘इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेतले जाते. बाकी कुणाचेच घेतले जात नाही.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नतद्रष्ट हिंदू !

‘मुलांनी श्रीमंत बापाची संपत्ती उधळून लावावी, तसे हिंदूंनी केले आहे. सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांपासून चालत आलेल्या हिंदु धर्मातील ज्ञानाला तुच्छ लेखून हिंदु धर्माची स्थिती केविलवाणी केली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संप्रदायांच्या प्रमुखांनो, हे लक्षात घ्या !

‘सांप्रदायिक साधनेतील बहुतेक भक्तांची प्रगती न झाल्यामुळे त्यांचा साधनेवरचा विश्‍वास डळमळीत होतो. असे होऊ नये म्हणून ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा सिद्धांत लक्षात घेऊन संप्रदायांच्या प्रमुखांनी तसे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी विविध साधनामार्गांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले