निवडणुकीसाठी उभे रहाणार्‍या उमेदवारांनो, हे लक्षात घ्या !

‘राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या अन् निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्याला मते देणार्‍या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापेक्षा ‘ईश्वराने भक्त म्हणून निवडणे अनंत पटींनी महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकीय पक्षांचा एककलमी कार्यक्रम !

‘राजकीय पक्षांचा एककलमी कार्यक्रम असतो, ‘जात्यंध आणि धर्मांध यांना खुश करून त्यांची मते मिळवणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे अज्ञान !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते स्वतःला आहे, तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) रहातात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माचे सर्वश्रेष्ठत्व !

‘इतर धर्मीय पैशांची लालूच दाखवून हिंदूंना आपल्या धर्मात घेतात, तर हिंदु धर्मात शिकवलेल्या साधनेचे महत्त्व कळल्यावर त्याग करणारे इतर धर्मीय हिंदु धर्माचे पालन करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

असे नेते देशाचे भले करू शकतील का ?

‘बहुतेक राजकीय पक्षांचे काही कार्यकर्तेच नाही, तर काही नेतेही पगारी नोकराप्रमाणे असतात. दुसर्‍या पक्षाने अधिक पैसे दिल्यास ते त्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते होतात ! असे कार्यकर्ते आणि नेते देशाचे भले करू शकतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

जे शाश्वताविषयी सांगते, ते सर्व ‘ज्ञान’ आहे. ज्याने ईश्वरप्राप्तीचा बोध होतो, ते ज्ञान आहे.

साम्यवादाची निरर्थकता !

‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ या शब्दाकडे आणि ईश्वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ʻहिंदुʼ शब्दाची सर्वव्यापकता !

‘हिंदु’ शब्दाची व्युत्पत्ती आहे, ‘हीनान् गुणान् दूषयति इति हिंदुः ।’ म्हणजे ‘हीन, कनिष्ठ अशा रज आणि तम गुणांचा नाश करणारा.’ किती हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या कार्यकर्त्यांना हे शिकवतात ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे अधिक भयावह प्रदूषण !

‘स्थुलातील, म्हणजे देह आणि वस्तू यांनी केलेल्या तात्कालिक प्रदूषणापेक्षा सूक्ष्मातील, म्हणजे मन आणि बुद्धी यांनी केलेले प्रदूषण अनेक पटींनी अधिक काळ हानीकारक असते, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि ईश्वराची आराधना करणारे साधक यांच्यातील भेद !

‘राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वार्थासाठी त्यांच्या पक्षाचे सरकार हवे असते, तर साधकांना ‘सर्वांचे चांगले व्हावे’, यासाठी ईश्वरी (धर्म) राज्य हवे असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले