हिंदूंनो, इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देऊ नका !
पाकिस्तानने भारतातील सर्वत्रच्या धर्मांधांच्या साहाय्याने भारतावर पुन्हा राज्य केल्यास त्याचे आश्चर्य वाटायला नको ! असे होऊ नये म्हणून हिंदूंनो, जागृत व्हा !
पाकिस्तानने भारतातील सर्वत्रच्या धर्मांधांच्या साहाय्याने भारतावर पुन्हा राज्य केल्यास त्याचे आश्चर्य वाटायला नको ! असे होऊ नये म्हणून हिंदूंनो, जागृत व्हा !
‘साधकांनो, ‘मला जमणार नाही’, यापेक्षा ‘मी देवाच्या साहाय्याविना काहीच करू शकत नाही’, असा भाव ठेवला, तर देवच साहाय्य करील. साधकांनी एवढी एकच परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विचार करायला हवा.
‘मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कुठे सहस्रो दावे प्रलंबित असतांना काही कृती न करणारी आतापर्यंतची सरकारे, तर कुठे जनतेतील एकाने केवळ संशय व्यक्त केल्यावर सीतेचा त्याग करणारे प्रभु श्रीराम ! . . . तर राजकारण्यांना जनता काही वर्षांतच विसरते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखाद्या सात्त्विक राजाचे चरित्र वाचून थोडा वेळ उत्साह वाटतो; पण ऋषिमुनींचे चरित्र आणि शिकवण वाचून अधिक काळ उत्साह वाटतो अन् साधनेला दिशा मिळते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन नको, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन हवा ! तसा दृष्टीकोन असल्यास कार्य चांगले होते आणि स्वतःचीही प्रगती होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’
‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘भ्रष्टाचार, बलात्कार, राष्ट्रद्रोह, धर्मद्रोह इत्यादी वाढण्याचे मूळ कारण म्हणजे समाजाला सात्त्विक बनवणारी साधना न शिकवणे. केवळ हिंदु राष्ट्रातच रामराज्याची अनुभूती येईल.’