परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘माणूस सोडून कोणताही प्राणी अथवा वनस्पती सुटी घेत नाही. देवही एक सेकंदाची सुटी घेत नाही. माणूस मात्र शनिवार आणि रविवार सुटी घेतो.
‘माणूस सोडून कोणताही प्राणी अथवा वनस्पती सुटी घेत नाही. देवही एक सेकंदाची सुटी घेत नाही. माणूस मात्र शनिवार आणि रविवार सुटी घेतो.
‘हल्लीच्या काळातील स्त्री-पुरुषांमधील प्रेम बहुदा केवळ शारीरिक प्रेम असते. त्यामुळे त्यांना लग्न करायचीही आवश्यकता वाटत नाही आणि त्यांनी लग्न केले, तर ते टिकत नाही. त्यांचे एकमेकांशी पटले नाही, तर ते मानसिक प्रेम नसल्याने जोडीदार बदलत रहातात.
‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून भ्रष्टाचार इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मानवाने निरनिराळी यंत्रे शोधली’, याचा अहंकार असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वराने जिवाणू, पशू, पक्षी, ७० – ८० वर्षे चालणारे एक यंत्र, म्हणजे मानवी शरीर यांच्यासारख्या अब्जावधी गोष्टी बनवल्या आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
अनेक राजकारणी त्यांच्या राजकीय पक्षाने त्यांना उमेदवारी नाही दिली, तर तो राजकीय पक्ष सोडून उमेदवारी देणार्या अन्य राजकीय पक्षात जातात. अशा पक्षनिष्ठा नसणार्या राजकारण्यांमध्ये देशनिष्ठा किती असणार ?
‘आगगाडीने प्रवास करतांना एखाद्या प्रवाशाचे स्थानक आले की, तो उतरतो आणि परत कधी भेटत नाही. त्याप्रमाणे जीवन प्रवासात एखाद्याचे आयुष्य संपले की, त्याचा मृत्यू होतो आणि परत त्याची कधी भेट होत नाही.’
‘डोळे उघडले की, दिसते. तसे साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत झाली की, सूक्ष्मातील दिसते आणि कळते. साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत न केल्यामुळे बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉक्टरांचे राष्ट्राविषयी मार्गदर्शन !
‘राजकारणी समाजात स्वतःच्या लाभासाठी ‘मला मत द्या’, असे सांगतात. याउलट साधक लोकांकडे स्वतःसाठी काही मागत नाहीत, उलट ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करा’, असे सांगतात !’