निरर्थक बुद्धीप्रामाण्यावादी आणि साम्यवादी !

‘भारतातील हिंदूंनाच नव्हे, तर जगातील मानवजातीला आधार वाटतो हिंदु धर्माचा ! त्यामुळे जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात. बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मविरोधी आणि साम्यवादी यांचे तत्त्वज्ञान शिकण्यासाठी भारतात कुणीही येत नाही; पण हेही त्यांच्या लक्षात येत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी हे लक्षात ठेवावे !

‘काम न करणे, भ्रष्टाचार करणे इत्यादींची सवय झालेले बहुतेक पोलीस आणि सरकारी कर्मचारी अन् अधिकारी यांना एकही खासगी आस्थापन एकही दिवस नोकरीत ठेवणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आद्य शंकराचार्य यांचा काळ आणि आताचा काळ यांतील धर्मविरोधकांमधील भेद !

‘आद्य शंकराचार्यांनी भारतात सर्वत्र फिरून हिंदु धर्माच्या विरोधकांबरोबर वाद-विवादात त्यांना जिंकून हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली. त्या काळचे विरोधक वाद-विवाद करत. याउलट हल्लीचे धर्मविरोधक वाद-विवाद न करता केवळ शारीरिक आणि बौद्धिक गुंडगिरी करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताची स्थिती बिकट होण्यामागील कारण जाणा !

‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करणार्‍यांनी हिंदूंमध्ये दुही निर्माण केली. त्यामुळे हिंदू आणि भारत यांची स्थिती बिकट झाली आहे; म्हणून दुही करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही होत ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बालवयातील मुलांसारखे हे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कधी विश्‍वबुद्धीतून ज्ञान मिळते का ? ‘विश्‍वबुद्धी’ असे काहीतरी आहे आणि विश्‍वबुद्धीतून ज्ञान मिळते, हे तरी त्यांना ठाऊक आहे का ? ठाऊक नसल्यानेच ते बालवयातील मुले बडबडतात, तसे बडबडतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आदर्श हिंदु राष्ट्र अर्थात्‌ रामराज्य !

‘हिंदु राष्ट्रात, म्हणजेच रामराज्यात लहानपणापासूनच साधना करवून घेण्यात येत असल्यामुळे व्यक्तीतील रज-तम गुणांचे प्रमाण अल्प होऊन व्यक्ती सात्त्विक बनते. त्यामुळे ‘गुन्हा करावा’, असा विचारही तिच्या मनात येत नाही ! साधनेमुळे सर्व प्रजा सात्त्विक असल्यामुळे कुणी गुन्हा करत नाही ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी आणि संत यांच्यातील भेद लक्षात घ्या !

‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्वरप्राप्ती करून देणारे संत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भगवंतच प्रत्येकाचा खरा आधार आहे !

‘कठीण समय येता कोण कामास येतो ?’ या प्रश्‍नाचे उत्तर आहे, ‘कठीण समय येता देवच कामास येतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण करणे आवश्यक !

‘धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण करणे, ही समष्टी साधनाच आहे ! ‘यामुळे ‘धर्मविरोधकांचे विचार अयोग्य आहेत’, हे काही जणांना तरी पटते आणि ते योग्य मार्गाने वाटचाल करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

म्हणे सर्वधर्मसमभाव !

‘बालवाडीतील मुलगा आणि पदव्युत्तर शिक्षण झालेला तरुण यांचे शिक्षण सारखेच आहे’, असे आपण म्हणत नाही. तशीच स्थिती इतर तथाकथित धर्म आणि हिंदु धर्म यांच्यात असतांना ‘सर्वधर्मसमभावा’चा घोष करणे, यासारखे दुसरे अज्ञान नाही. . . असे म्हणणार्‍या आंधळ्यासारखे ‘सर्वधर्मसमभावी’ झाले आहेत.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले