ही लोकशाहीची शोकांतिका नव्हे का ? 

उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये समाजवादी पक्षाने ७५ टक्के, राष्ट्रीय लोकदलाने ५९, भाजपने ५१, काँग्रेसने ३६, बसपने ३४, तर ‘आप’ने १५ टक्के गुन्हे नोंद असणार्‍यांना उमेदवारी दिली आहे.

ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी काँग्रेस !

मी हिंदु असल्याने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या स्पर्धेतून बाहेर फेकलो गेलो, असे विधान पंजाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखड यांनी केले आहे. पंजाब शीखबहुल राज्य आहे. काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून लवकरच नाव घोषित करण्यात येणार आहे.

पाकमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

पाकिस्तानच्या डहारकी शहरापासून २ किलोमीटर अंतरावर सुतान लाल देवान या हिंदु व्यापार्‍याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. सुतान यांना ‘जिवंत रहायचे असेल, तर भारतात निघून जा’ अशा धमक्या दिल्या जात होत्या.

झोपलेले रेल्वे प्रशासन !

बेंगळुरू (कर्नाटक) येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ मध्ये हमालांच्या विश्रांती कक्षाला प्रार्थनास्थळ बनवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला आहे.

देशातील प्रत्येक गावात गोशाळा हवी !

प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा उभारली, तरी पुरणार नाही. जिल्हा आणि तालुका पातळीवरच नव्हे, तर ग्राम पातळीवरही गोशाळा निर्माण केल्या पाहिजेत, अशी सूचना कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.

हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हणणारे निधर्मी आता गप्प का ?

राजकोट (गुजरात) येथे सामाजिक माध्यमांतून ईशनिंदा करण्यात आल्याचा आरोप करत धर्मांधांनी येथील हिंदूंवर आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी २ अल्पवयीन मुलांसह १२ धर्मांधांना अटक केली आहे.

तमिळनाडू सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

तमिळनाडूतील कॉन्व्हेंट शाळेतील १२ वीची विद्यार्थिनी लावण्या हिचा धर्मांतरासाठी छळ करण्यात आल्याने तिने आत्महत्या केली. या घटनेच्या चौकशीसाठी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाला तमिळनाडूतील द्रमुक सरकारने नकार दिला.

हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी केली, तर चुकीचे कसे ?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेला ‘ख्रिस्ती राष्ट्र’ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांना २८ गव्हर्नरांचे (राज्यांच्या प्रमुखांचे) समर्थनही मिळाले आहे. ट्रम्प यांना ‘ख्रिस्ती अमेरिकींचा नायक’ संबोधले जात आहे.

भारतात जीनाच्या नावाने टॉवर कशाला ?

गुंटूर (आंधप्रदेश) येथे जमावबंदीचे उल्लंघन करत महंमद अली जीना टॉवर येथे प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी ‘हिंदु वाहिनी’ संघटनेच्या तिघा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

अल्पसंख्य हे बहुसंख्य झाल्यावरची स्थिती जाणा !

‘शामली जिल्ह्यामध्ये तुम्ही जाट लोक केवळ २४ सहस्र आहात आणि आम्ही ९० सहस्र आहोत’, अशी धमकी देणारा धर्मांधांचा एक व्हिडिओ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार शलभमणी त्रिपाठी यांनी ट्वीट केला आहे.