भारतियांवर केली वर्णद्वेषी टीका !
(यू ट्यूबर म्हणजे यू ट्यूबर व्हिडिओज प्रसारित करणारा)
लंडन (ब्रिटन) – माईल्स रूटलेज नावाच्या ब्रिटीश यू ट्यूबरने(British YouTuber) भारतियांच्या विरोधात वर्णद्वेषी टीका केली आहे. तसेच भारतियांच्या बोलण्याच्या पद्धतीचीही यासमवेत त्याने भारतावर अणूबाँब टाकण्याची धमकीही दिली आहे. यामुळे सामाजिक माध्यमांतून माईल्सवर मोठ्या प्रमाणात टीका चालू आहे. त्याला विरोध करणार्यांना माईल्स अर्वाच्च भाषेत बोलत आहे.
१. २५ वर्षीय राऊटलेज हा एक विद्यार्थी आणि यू ट्यूबर आहे. वर्ष २०२१ मध्ये तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला.
२. अणूबाँबविषयी रूटलेजने लिहिले की, जेव्हा मी ब्रिटनचा पंतप्रधान होईन, तेव्हा मी ब्रिटिशांचे हितसंबंध आणि सूत्रे यांमध्ये हस्तक्षेप करणार्या कोणत्याही विदेशी शक्तींना चेतावणी देण्यासाठी त्यांच्या विरोधात आण्विक युद्धाची घोषणा करीन. मी केवळ भारतावर अण्वस्त्र प्रक्षेपित करू शकतो.
३. वर्ष २०२१ मध्ये राऊटलेज याने अफगाणिस्तानला भेट दिली होती. तिथे तालिबानने त्याला कह्यात घेतले होते. नंतर इतर परदेशी नागरिकांप्रमाणेच अमेरिकी आणि ब्रिटीश सरकारने त्याला तेथून बाहेर काढले होते.
४. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याने पुन्हा अफगाणिस्तानला भेट दिली होती. तेव्हाही त्याला तालिबानच्या गुप्तचरांनी कह्यात घेतले होते. रूटलेज म्हणतो, ‘मला तालिबानच्या गुप्तचरांनी ८ महिने कह्यात ठेवले होते. या कालावधीत मी तालिबान सरकारमधील उच्च लोकांशी मैत्री केली आणि नंतर मला परत बोलावण्यात आले.
५. त्याच्या यू ट्यूब चॅनलचे १ लाख २६ सहस्र सदस्य आहेत.
संपादकीय भूमिका
|