भाव, भक्ती अन् श्रद्धा असलेल्या आनंदीताई तळमळीने साधना करिती ।

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ यांचा नुकताच ५५ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांनी त्यांच्याविषयी केलेली कविता पुढे दिली आहे.

पू. शिवाजी वटकर

काही वर्षांपासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला ‘साधकांचे लेख, अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे’ इत्यादी लिखाणाचे संकलन करण्याची सेवा मिळाली आहे. माझा अनुभव आणि शिक्षण पहाता माझ्यासाठी संकलनाची सेवा करणे कठीण आहे; मात्र मला ही सेवा करण्यासाठी संकलनाच्या संदर्भात सेवा करणार्‍या सद्गुणी साधकांचा सत्संग लाभला आहे. त्यांतील एक महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व म्हणजे सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ ! मला केवळ सेवेसाठी नव्हे, तर साधनेसाठीही त्यांचे अनमोल साहाय्य मिळत आहे; कारण आम्ही एकमेकांच्या चुका मनमोकळेपणाने सांगून त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. आमची आध्यात्मिक जवळीक झाली आहे. सौ. आनंदी यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त पुढील कविता लिहितांना मला आनंद होत आहे. ‘आनंदी’ नावाच्या फुलाचा आध्यात्मिक विकास व्हावा आणि आनंदीताईंच्या जीवनात सुगंध दरवळावा’, अशी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करतो.

सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

आनंदीताई तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासातही दिसतात आनंदी ।
तळमळीने नामजपादी उपाय अन् समष्टी साधना करिती ।। १ ।।

तत्त्वनिष्ठ राहूनी साधकांच्या लिखाणातील चुका सुधारती ।
वैचारिक प्रगल्भतेने सहसाधकांना प्रेमाने साहाय्य करिती ।। २ ।।

भाव, भक्ती अन् श्रद्धा असलेल्या आनंदीताई तळमळीने साधना करिती ।
साधकांचे लिखाण सुधारून, संकलनाची गुरुसेवा करिती ।। ३ ।।

ताईंनी केली परात्पर गुरु पांडे महाराजांची अविरत सेवा ।
व्यष्टी साधना अन् सेवा यांचा मेळ बसवूनी गाठावा पुढचा टप्पा ।। ४ ।।

आनंदीताई देवद आश्रमातील साधकांशी जवळीक साधती ।
त्यांच्या जीवनी आनंद ओसंडून वहावा, हीच प्रार्थना गुरुचरणी ।। ५ ।।

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.६.२०२४)