मुंबई – महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या ११ जागा २७ जुलैला रिक्त होत असून सध्याचे संख्याबळ पहाता भाजप ५, शिवसेना १, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी होऊ शकतात, अशी स्थिती आहे. यातील ५ जागांवर भाजपने उमेदवार घोषित केले असून यात पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे यांचा समावेश आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे या पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे भाजपकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.