संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे २९ जूनला प्रस्थान

श्रीक्षेत्र आळंदी (पुणे) – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे यंदा २९ जूनला प्रस्थान होणार आहे. पालखी ३० जूनला सायंकाळी पुण्यात भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. ६ जुलैला माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान होईल. १४ जुलैला चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण, तर १२ जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होणार आहे. १५ जुलैला पालखी वाखरी येथे आणि १७ जुलै या दिवशी ती श्रीक्षेत्र पंढरपूरला पोचेल. पालखी सोहळ्याचा समारोप ३१ जुलै या दिवशी आळंदी येथे होणार आहे.