पुणे येथील प्रसिद्ध वैशाली हॉटेलवर अतिक्रमण विभागाची कारवाई !

पुणे – पुणे येथील अवैध बार, हॉटेल यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम वेगाने चालू आहे. काही हॉटेलचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात येत आहे. पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॅाटेलवर अतिक्रमणविरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. हॉटेलचे ५ सहस्र चौरस फूट बांधकाम तोडण्यात आले आहे. २५ जून या दिवशी महानगरपालिकेने २६ हॉटेल्सवर कारवाई केली असून यात वैशाली हॉटेलमधील अवैध बांधकाम तोडण्यात आले आहे. आतापर्यंत पुण्यातील १४४ हॉटेलांवर कारवाई करण्यात आली आहे.

अनधिकृत हॉटेल, पब यांवर महापालिकेची कारवाई चालूच रहाणार असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात ‘एल्-३’ या हॉटेलमध्ये अमली पदार्थ सेवन केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवैध हॉटेल, पब यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.