धर्माचरणाची आवड असणारी महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथील कु. मनस्वी मुकेश काकडे (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मनस्वी काकडे ही या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२४ मध्ये कु. मनस्वी काकडे हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.’ – संकलक)

कु. मनस्वी मुकेश काकडे हिचा नुकताच ८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आजोबांना (आईच्या वडिलांना) तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. मनस्वी काकडे
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ 

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. नम्रता

‘मनस्वी प्रत्येकाशी नेहमी नम्रतेने आणि आदराने बोलते.

श्री. विनोद कोंगरे

२. उत्तम बुद्धीमत्ता

मनस्वी इयत्ता दुसरीत आहे. ती डिसेंबर २०२३ च्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत गणित विषय घेऊन परीक्षेला बसली होती. त्या परीक्षेमध्ये तिला सुयश मिळाले असून सर्वत्र तिचे अभिनंदन केले जात आहे. या परीक्षेमध्ये तिने आंतरराष्ट्रीय गुणवत्ता सूचीत १२५ वा आणि शाळेमध्ये पहिला क्रमांक मिळवला असून तिला सुवर्ण पदक मिळाले आहे.

३. शांत आणि समंजस

कधी आई तिच्यावर रागावली, तर ती आईला समजावून सांगते, ‘‘आई, तू कशाला चिडतेस ? चिडू नकोस.’’

४. ऐकण्याची वृत्ती

तिला कुणीही कुठलेही काम सांगितले, तरी ती कधीच नकार देत नाही. ती घरातील सर्वांचे ऐकते. ती कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करत नाही.

५. आसक्ती नसणे

तिला खेळणी किंवा कपडे यांची आसक्ती नाही. ‘‘तुला नवीन कपडे घेऊया’’, असे तिला म्हटल्यावर ती म्हणते, ‘‘माझ्याकडे भरपूर कपडे आहेत. मला नकोत.’’

६. प्रेमभाव

अ. लहान मुले घरी आल्यावर ती त्यांना प्रेमाने खाऊ देते आणि त्यांच्या समवेत खेळते.

आ. ती तिच्या आईला कामामध्ये साहाय्य करते.

इ. तिची आजी रुग्णाईत असतांना मनस्वी आजीची काळजी घेत असे. ‌ती आजीला प्रतिदिन प्रेमाने औषध देत असे.

७. साधनेची ओढ वाढणे

तिची साधनेची ओढ वाढली आहे. ती प्रतिदिन अंघोळ केल्यानंतर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ हा नामजप लिहिते. सायंकाळी ती ‘शुभंकरोती..’ म्हणते आणि हनुमान चालिसाचे पठण करते.

८. स्वभावदोष

आळशीपणा

९. कृतज्ञता

‘सच्चिदानंद परब्रह्म प.पू. गुरुमाऊली, तुमच्या अपार कृपेमुळे ही दैवी बालिका आम्हाला नात म्हणून लाभली आहे’, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. विनोद कोंगरे (मनस्वीचे आजोबा (आईचे वडील, आध्यात्मिक पातळी ६० टक्के)), राजुरा, जिल्हा चंद्रपूर. (२३.४.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.