श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. ‘देवाच्या अनुसंधानात रहाणे’, याचे ज्ञान होण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. मोठमोठे ग्रंथ वाचणे, म्हणजे खरे ज्ञान नव्हे. त्या ग्रंथांतील सार समजून घेऊन त्याप्रमाणे वागणे, हे खरे ज्ञान आहे.’

२. ‘नुसत्या तात्त्विक ज्ञानाने ईश्वर मिळत नाही, तर त्या ज्ञानाने प्रेरित होऊन त्यातून प्रत्यक्ष केलेल्या प्रायोगिक कर्माने ईश्वरप्राप्ती होते.’

३. ‘शुद्धतेमध्ये सर्व तत्त्वे एकवटलेली असतात. शुद्धता म्हणजे ईश्वरी गुणांचे दर्शन ! साधनेने शुद्धता येते. मायेतील कर्म देहाला अशुद्ध करते. अशुद्धता म्हणजे वासना आणि मायेत अडकणे, तर शुद्धता म्हणजे वासनांचे निराकरण अन् ईश्वराकडे वाटचाल करणे ! वासनांचे निराकरण करण्यासाठी साधना हवी.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२४.४.२०२०)