राहुल गांधी यांनी १९ ऑगस्टपूर्वी प्रथमवर्ग सत्र न्यायालयामध्ये उपस्थित रहावे !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण !

राहुल गांधी

 पुणे – राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतियांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संदर्भ देऊन काही आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे न्यायालयामध्ये मानहानीचा फौजदारी दावा प्रविष्ट केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविषयी सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणी राहुल गांधी यांना १९ ऑगस्टच्या आत पुणे न्यायालयासमोर उपस्थित रहाण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला आहे.