Isro Tested Liquid Rocket Engine : ‘इस्रो’ने केली ‘लिक्विड रॉकेट इंजिन’ची यशस्वी चाचणी !

‘लिक्विड रॉकेट इंजिन’ची यशस्वी चाचणी

बेंगळुरू (कर्नाटक) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने ‘डिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी’च्या साहाय्याने बनवलेल्या ‘लिक्विड रॉकेट इंजिन’ची यशस्वी चाचणी केली. त्याला सामान्यतः ‘थ्रीडी प्रिंटिंग’ म्हणून ओळखले जाते.

‘ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन’ (पी.एस्.एल्.व्ही.) हे चौथ्या टप्प्यांचे रॉकेट आहे. लिक्विड रॉकेट इंजिन हे पी.एस्.एल्.व्ही.च्या वरील टप्प्याचे इंजिन आहे.

थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे इस्रोला इंजिनमधील भागांची संख्या १४ वरून १ वर आणण्यात साहाय्य झाले. त्यामुळे ९७ टक्के कच्च्या मालाची बचत झाली. तसेच उत्पादनासाठीचा एकूण वेळ ६० टक्क्यांनी अल्प  झाला.