(म्हणे) ‘चिक्कमगळुरू येथील दत्तपिठात नियुक्त करण्यात आलेल्या २ हिंदु पुजार्‍यांना माघारी बोलवा !’

‘सौहार्द वैदिके’चे सचिव गौसे मोहिउद्दीन यांची हिंदुद्वेषी मागणी

दत्तपीठ

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील सौहार्द वेदिके संघटनेचे सचिव गौसे मोहिउद्दीन यांनी चिक्कमगळुरू प्रशासनाकडे मागणी केली आहे की, येथील दत्तपिठामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या २ हिंदु पुजार्‍यांना परत पाठवले पाहिजे. या दोघांना ३ दिवसांच्या दत्तजयंती उत्सवानिमित्तच तात्पुरते नियुक्त करण्यात आले होते. उत्सव झाल्यानंतरही त्यांनी पूजा करण्याचे काम चालू ठेवले आहे.

गौसे मोहिउद्दीन यांनी पुढे असेही म्हटले की, येथील मुसलमान पुजार्‍यांना ‘गुहेतील मंदिर अपवित्र होईल’ असे सांगून तेथून हटवण्यात आले होते. हा त्यांचा अवमान आहे. (यात अपमानित होण्यासारखे काय आहे ? मुसलमान गोमांस भक्षण करतात. जे हिंदूंसाठी पाप आहे. त्यामुळे ‘अशांमुळे मंदिर अपवित्र होईल’, असे हिंदूंना वाटल्यास त्यात चूक ते काय ? – संपादक) हा हिंदु पुजार्‍यांना कायम ठेवून दर्ग्याची संपत्ती बळकावण्याचा डाव असू शकतो. (चोराच्या उलट्या बोंबा ! हिंदूंनी येथील भूमी बळकावली नसून मुसलमानांनी हिंदूंचे तीर्थक्षेत्र बळकावले आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • दत्तपीठ हे हिंदूंचे स्थान आहे आणि ते बळकावण्याचा प्रयत्न मुसलमान सातत्याने करत आहेत. आता राज्यातील भाजप सरकारने ते अधिकृतपणे हिंदूंच्या नियंत्रणात येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !