आणखी २ विद्यार्थ्यांना अटक ! : आरोग्य भरती पेपरफुटीचे प्रकरण

पुणे – आरोग्य भरती पेपरफुटीच्या प्रकरणी पोलिसांनी नामदेव कारंडे आणि उमेश मोहिते या दोघांना १० डिसेंबर या दिवशी अटक केली आहे. लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेने या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन पेपर दिले होते. काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाचा पेपर आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनीच इतरांच्या साहाय्याने फोडल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी राज्यातून अटक केलेल्यांची संख्या १४ वर गेली आहे.