मद्रास उच्च न्यायालयाकडून मंदिरांमधील मुख्य पुजार्‍यांच्या नियुक्तीचे प्रकरण ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश !

मंदिरांचे सरकारीकरण झाले की, सरकार कुणालाही मंदिराचे पुजारी आणि सेवक नियुक्त करून हिंदूंच्या परंपरांचे हनन करते, हे लक्षात घ्या ! – संपादक

मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने हिंदूंच्या मंदिरांमधील मुख्य पुजार्‍यांच्या नियुक्तीचे प्रकरण ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला आहे. ‘अखिल भारतीय आदि शैव शिवाचार्य सेवा संगम’च्या याचिकेवर सुनावणी करतांना हा अंतरिम आदेश देण्यात आला आहे. पुढील सुनावणी २५ ऑगस्ट या दिवशी करण्यात येणार आहे. राज्यातील मुख्य पुजारी, परिचारक आदी पदांसाठी सरकारकडून अर्ज मागवण्याचे विज्ञापन ६ जुलै या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले होते. उच्च न्यायालयात याचिका करून ‘अखिल भारतीय आदि शैव शिवाचार्य सेवा संगम’ने विज्ञापन रहित करण्याची मागणी केली होती.