आंबिवली येथे आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आक्रमण करणारा इराणी टोळीचा सूत्रधार अटकेत !

ठाणे, १६ जून (वार्ता.) – आंबिवली येथे आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर इराणी टोळीकडून आक्रमण होते. या आक्रमणांचे नियोजन करणारा इराणी टोळीचा सूत्रधार अब्दुल्ला संजय इराणी याला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. (कठोर शिक्षा होत नसल्यानेच धर्मांध इराणींना गुन्हे करण्याचे भय वाटत नाही. याचा पोलीस प्रशासनाने विचार करायला हवा ! – संपादक) त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ७५ सहस्र रुपयांचे दागिने, १६ दुचाकी आणि धारदार हत्यारे जप्त केली आहेत. त्याच्यावर कल्याण, ठाणे, मुंबई, नवी मुंबई यांसह महाराष्ट्रात ५६ गुन्हे नोंद आहेत. याप्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.