कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो ! – संशोधन

कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो, असे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे.

रुग्णसेवा नाकारल्यास खासगी रुग्णालयाचे अनुमतीपत्र रहित करण्यात येईल ! – राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

काही आधुनिक वैद्य आणि खासगी रुग्णालये त्यांच्या ‘ओपीडी’मध्ये येणार्‍या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने कोरोना ही मोठी आणीबाणी भारत देशावर आलेली आहे.

पुणे येथील पहिले कोरोनाबाधित दांपत्य ठीक झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडले

कोरोनाचे शहरातील पहिले रुग्ण ठरलेल्या दांपत्याची दुसरी चाचणीही ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना रुग्णालयातून २५ मार्चला ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ९ मार्चला नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

कस्तुरबा रुग्णालयातील १२ संशयितांना कोरोनाची लागण नसल्याचे निष्पन्न

येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात कोरोनाबाधित म्हणून उपचार चालू असलेल्या रुग्णांच्या दुसर्‍यांदा घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये १२ जणांना कोरोनाची लागण नसल्याचे आढळून आले आहे.