संतांचे केवळ चरित्र वाचण्यापेक्षा त्यांची शिकवण आत्मसात करावी !

तांचे चरित्र वाचले, तर त्यातून ‘केवळ त्यांनी साधना कशी केली’, हे समजते. त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी चमत्कार केल्याचा उल्लेख असेल, तर त्यातून आपल्या मनात केवळ त्यांच्याविषयी विश्वास निर्माण होतो. त्यांची शिकवण अभ्यासली, तरच आपली साधनाही त्यांच्यासारखी होऊ शकते

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवादी पुरोगामी नाही, तर अधोगामी असतात. त्यामुळे ते अधोगतीला जातात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

‘हिंदु राष्ट्रा’साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा !

‘नष्ट करणे सोपे असते; पण घडवणे कठीण असते. असे असले, तरी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधक आणि हिंदु राष्ट्र यांना घडवायचे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

अद्वितीय राष्ट्र ‘भारत’ !

‘पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जनताद्रोही राजकीय पक्ष !

‘निवडणुका आणि सरकारविरुद्धच्या काही मोहिमा सोडल्यास राजकीय पक्ष नागरिकांचे अन् देशाचे भले व्हावे, म्हणून एकतरी मोहीम राबवतात का ? त्या संदर्भात ते काही करतात का ?’  – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची मर्यादा !

आंधळा म्हणतो, ‘दृश्य जग असे काही नाही.’ त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आणि बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतात, ‘सूक्ष्म जग’, भूते इत्यादी काही नाही’; कारण त्यांना सूक्ष्मातील विषय समजून घेण्याची जिज्ञासा नसते

असे असतांना देशाचे कधी भले होईल का ?

‘देशाचे काहीही होवो, मला पद मिळाले की झाले’, या वृत्तीचे राजकारणी असल्यावर देशाचे कधी भले होईल का ?’

माणूस श्रेष्ठ कि प्राणी आणि वनस्पती ?

‘माणूस सोडून कोणताही प्राणी अथवा वनस्पती सुटी घेत नाही. देवही एक सेकंदाची सुटी घेत नाही. माणूस मात्र शनिवार आणि रविवार सुटी घेतो. एवढेच नव्हे, तर वर्षातूनही काही दिवस हक्काने सुटी घेतो. असे असतांना यासंदर्भात माणूस श्रेष्ठ….

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची पात्रता !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील ‘देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने ‘वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘विज्ञानाची भाषा इंग्रजी आहे, तर अध्यात्माची भाषा संस्कृत आणि संस्कृतोद्भव भाषा आहेत. यामुळे ईश्वरप्राप्ती करू इच्छिणार्‍यांनी संस्कृत किंवा संस्कृतोद्भव भाषेतच अध्यात्म शिकावे.’