कुठे आदर्श प्रभु श्रीराम आणि कुठे आजचे अकार्यक्षम राजकारणी !

‘कुठे सहस्रो दावे प्रलंबित असतांना काही कृती न करणारी आतापर्यंतची सरकारे, तर कुठे जनतेतील एकाने केवळ संशय व्यक्त केल्यावर सीतेचा त्याग करणारे प्रभु श्रीराम ! . . . तर राजकारण्यांना जनता काही वर्षांतच विसरते.’ –  (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

क्षात्रतेजापेक्षा साधनेचे ब्राह्मतेज महत्त्वाचे !

‘एखाद्या सात्त्विक राजाचे चरित्र वाचून थोडा वेळ उत्साह वाटतो; पण ऋषिमुनींचे चरित्र आणि शिकवण वाचून अधिक काळ उत्साह वाटतो अन् साधनेला दिशा मिळते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन नको, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन हवा ! तसा दृष्टीकोन असल्यास कार्य चांगले होते आणि स्वतःचीही प्रगती होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

‘कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी न जाता केवळ वरवरचे उपाय करणारी आणि त्यामुळे राष्ट्राला देशोधडीला लावणारी सर्वपक्षीय सरकारे !

‘भ्रष्टाचार, बलात्कार, राष्ट्रद्रोह, धर्मद्रोह इत्यादी वाढण्याचे मूळ कारण म्हणजे समाजाला सात्त्विक बनवणारी साधना न शिकवणे. केवळ हिंदु राष्ट्रातच रामराज्याची अनुभूती येईल.’

हिंदु राष्ट्रात चांगलेच राज्यकर्ते असतील !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत निवडून आलेले राजकीय पक्ष ‘चांगले’ म्हणून निवडून आलेले नाहीत, तर इतर पक्षांपेक्षा कमी वाईट म्हणून निवडून आले आहेत !

भारताच्या दुरावस्थेवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हाच उपाय !

‘कुठे इंग्लंडहून आलेले मूठभर इंग्रज संपूर्ण भारतावर काही वर्षांतच राज्य करू लागले, तर कुठे स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांच्या काळात दुभंगलेल्या भारतावरही राज्य करता न येणारे शासनकर्ते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारतात गुन्ह्यांची नोंद अल्प प्रमाणात होण्याचे कारण

‘बहुतेक जण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जात नाहीत; कारण त्यांना ठाऊक असते की, तेथे वेळ फुकट जाऊन कधीकधी पोलिसांच्या उद्धटपणामुळे अपमान सहन करावा लागेल आणि शेवटी फलनिष्पत्ती काहीच मिळणार नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले