‘आजची साधना उद्या करणे’, हे काही वेळा अपरिहार्य असते !

‘कधीतरी एखाद्या दिवशी कामाच्‍या घाईगर्दीत साधनेस वेळ मिळाला नाही, उदा. साधनेच्‍या वेळी कुणी अकस्‍मात् आजारी पडला, तर त्‍याला डॉक्‍टरांकडे न्‍यावे लागते. तेव्‍हा ‘आजची साधना उद्या करणे’, हे अपरिहार्य असते.’

ध्‍यान आणि जप एकमेकांचे परिपोषक आहेत !

जपाविना ध्‍यान होत नाही. ध्‍यान ठीक केल्‍याविना जप होणार नाही; म्‍हणून जप करतांना ध्‍यान लावाल, तेव्‍हाच जप ठीक होईल आणि जप ठीक होईल

अमृतबिंदू

‘आसक्‍ती मोठी दुर्जय आहे; परंतु तीच आसक्‍ती जर भगवंतात, भगवंताच्‍या लाडक्‍या ब्रह्मवेत्ता संतांमध्‍ये आणि भगवंताच्‍या नामात होते, तेव्‍हा ती सर्व दुःख मिटवून स्‍वतःला परम सुखरूप बनवते.’

सुखासाठी बाहेर भटकू नको, आनंद तुझा आत्‍मा आहे !

‘आनंद तुझा आत्‍मा आहे, प्रसन्‍नता तुझा आत्‍मा आहे, गुरुकृपा तुझ्‍या समवेत आहे आणि तरीही तू सुखासाठी बाहेर भटकतो ! कुठपर्यंत ? आपल्‍या खर्‍या घरात ये. शरिराचे घर तर चार भिंतींचे आहे आणि तुझे घर तर हृदयेश्‍वराचे द्वार आहे !’

श्रीहरि स्‍मरणाने दुःखे दूर होतात

‘जसे सूर्योदय होताच रात्र पळून जाते, सिंहाची गर्जना ऐकताच हत्तीला भीती वाटते, तसेच हरिभक्‍त समोर येताच संकटे पळून जातात. त्‍यांच्‍या दृष्‍टीच्‍या समोर येतच नाहीत. जसे महालक्ष्मी येताच दरिद्री माणसाचे दारिद्य्र दूर होते, तसेच (सर्वव्‍यापक, सर्वांचे अंतरात्‍मा) श्रीहरीचे स्‍मरण केल्‍याने जन्‍म-मरणरूपी दुःख दूर होते.’

पुष्‍कळ सोपे आहे र्‍हास थांबवून स्‍वतःचा विकास करणे !

‘व्‍यर्थ चिंतनाचा त्‍याग करावा. व्‍यर्थ चिंतन हटवण्‍यासाठी अधूनमधून ‘ॐ’काराचे उच्‍चारण, स्‍मरण करावे. व्‍यर्थ चिंतनाने शक्‍तीचा र्‍हास होतो, विवंचना होत रहाते. त्‍यात बरीच शक्‍ती खर्च होते. भगवद़्-उच्‍चारण, स्‍मरण याने व्‍यर्थ चिंतनाचा अंत होतो.

त्रासदायक अर्थ असणार्‍या आडनावांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने अशी आडनावे पालटा !

‘काही जणांची आडनावे ‘गळाकाटू, ढेकणे, म्हैसधुणे, चिकटे, चकणे, चोर, चोरटे, रगतचाटे, चोरमुले, चोरे, बहिरे, दहातोंडे, पायमोडे, डोईफोडे, मानकापे, तांगतोडे’, अशी असतात.

‘आनंद’ हेच प्रसारसेवेतून मिळणारे वेतन !

‘एका साधिकेने सत्‍संगात प्रसार सेवेतील काही अनुभव सांगितले. एका वाचकाच्‍या मुलाने त्‍या साधिकेला विचारले, ‘‘तुम्‍ही जी सेवा करता, त्‍याचे तुम्‍हाला किती वेतन मिळते ?’’ त्‍या साधिकेने सांगितले, ‘‘आम्‍ही आनंदप्राप्‍तीसाठी आणि ‘आमची साधना व्‍हावी’, यासाठी विनामूल्‍य सेवा करतो.’’