Pakistan Bomb Blast : पाकिस्तानात रेल्वे स्थानकावर झालेल्या बाँबस्फोटात १४ सैनिकांसह २४ जणांचा मृत्यू : ४० जण घायाळ

क्वेटा (पाकिस्तान) – येथील रेल्वे स्थानकावर झालेल्या बाँबस्फोटात १४ सैनिकांसह २४ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घायाळांवर रुग्णालयात उपचार चालू आहे. या स्फोटाचे दायित्व ‘बलुच लिबरेशन आर्मी’ या संघटनेने स्वीकारले आहे. ज्या वेळी स्फोट झाला, त्या वेळी स्थानकावर मोठी गर्दी होती; कारण येथून एक पॅसेंजर गाडी जाणार होती आणि एक पॅसेंजर गाडी येणार होती.

संपादकीय भूमिका

यांसारख्या घटनांतून ‘आम्ही आतंकवादाने पीडित आहोत’, असे सांगण्यास पाकिस्तान मोकळा रहातो आणि दुसरीकडे भारतात आतंकवादी कारवाया घडवत रहतो !