साधकांमधील गुणांची वृद्धी होण्यासाठी साधिकेला समष्टीचे लक्षात आलेले महत्त्व !

सौ. स्‍वाती शिंदे

१. ‘फुलातील सुगंध त्याच्या कळीमध्ये लपलेला असतो. कळी असतांना तिचा सुगंध दरवळत नाही; मात्र जसजसे फूल उमलू लागते, तसतसा सुगंध दरवळू लागतो.

२. साधनेमध्ये आपण जसजसे पुढे जातो, तसतसे आपल्यातील गुणरूपी पाकळ्या उमलू लागतात आणि त्या गुणांचा सुगंध सर्वत्र पसरतो.

३. समष्टीबद्दल कृतज्ञताभाव ठेवण्याचे लक्षात आलेले महत्त्व : कळी उमलण्यासाठी सूर्यप्रकाश आणि पोषक वातावरण लागते. त्याप्रमाणे माझ्यासारख्या साधकांमधील गुणांची वृद्धी होण्यासाठी समष्टी आवश्यक आहे. ‘मी समष्टीविना उमलू शकत नाही (माझ्यामधील गुण विकसित होऊ शकत नाही)’, याची मला जाणीव झाली. ‘मी समष्टीबद्दल कृतज्ञताभाव वाढायला हवा’, हे गुरुदेवांच्या कृपेने माझ्या लक्षात आले.

४. गुरुदेवांना शरण गेल्यास प्रत्येक गोष्ट आणि घडणारा प्रसंग यांतून शिकता येणे : माझ्या आजूबाजूला अनेक गोष्टी आणि प्रसंग घडतात. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) त्यातून मला काहीतरी शिकवत असतात; पण ते प्रत्येक वेळी माझ्या लक्षात येत नाही. ‘गुरुदेवांना शरण गेले, तर प्रत्येक गोष्ट आणि घडणारा प्रसंग यांतून बरेच शिकता येते’, हे माझ्या लक्षात आले. त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !’

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.९.२०२३)