Serbia Attack : सर्बियातील इस्रायली दूतावासावर गोळीबार

  • पोलिसांच्या प्रत्युत्तरात आक्रमणकर्ता ठार

  • आक्रमणकर्त्याने स्वीकारला होता इस्लाम

बेलग्रेड (सर्बिया) – येथील इस्रायलच्या दूतावासाबाहेरील पोलिसावर एका व्यक्तीने गोळीबार केल्यावर या पोलिसाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात या व्यक्तीचा मृत्यू झाला. सर्बियाच्या पंतप्रधानांनी या आक्रमणाला ‘आतंकवादी कृत्य’ म्हटले आहे. गोळीबारात घायाळ झालेल्या पोलिसावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या घटनेनंतर दूतावास बंद करण्यात आला आहे.

पोलिसावर गोळीबार करणारा म्लादेनोव्हाक शहरातील आहे. त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता. तो सर्बियातील बोस्नियाक मुसलमान अल्पसंख्यांकांचे ऐतिहासिक आणि राजकीय केंद्र नोवी पझार येथे रहाण्यासाठी गेला होता. हे देशातील इस्लामचे केंद्र आहे.