श्रीक्षेत्र देहू (पुणे) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे २८ जून या दिवशी प्रस्थान होईल. देहूतील मुख्य मंदिरातून २८ जून या दिवशी पालखी प्रस्थान होणार आहे. पहिला मुक्काम श्री क्षेत्र देहूगाव येथील इनामदार साहेब वाड्यात होईल. प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले गोल रिंगण ८ जुलै या दिवशी होणार आहे. पालखी १७ जुलैला श्रीक्षेत्र पंढरपूरला पोचणार असून २७ जुलैला परतीच्या प्रवास चालू होणार आहे. पालखी सोहळ्याचा समारोप ३१ जुलै या दिवशी देहूतील मुख्य मंदिरात होणार आहे.