प्रेमळ आणि शिकण्याची वृत्ती असलेल्या सोनाली बधाले !

उद्या ज्येष्ठ कृष्ण नवमी (३०.६.२०२४) या दिवशी सोनाली बधाले यांचा ३१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सोनाली यांची आई श्रीमती संध्या बधाले यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सोनाली बधाले

सोनाली बधाले यांना ३१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

श्रीमती संध्या बधाले

१. ‘सोनालीचे रहाणीमान अतिशय साधे आहे. तिला वस्तू आणि कपडे यांची आसक्ती नाही. ती तिच्याकडे जे आहे, त्यात आनंदी असते.

२. सोनालीला रांगोळ्या आणि मेंदी छान काढता येते, तसेच तिचे अक्षरही सुंदर आहे.

३. प्रेमभाव

अ. तिच्या दोन्ही भावांच्या लग्नात तिने खरेदीपासून देवदर्शनापर्यंतचे नियोजन सगळ्यांना विचारून केले. तिने तिच्या दोन्ही भावजयांसाठी (सौ. आनंदी आणि सौ. वैष्णवी (पूर्वाश्रमीची कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय २४ वर्षे)) यांच्यासाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार सगळी खरेदी केली.

आ. ती तिच्याकडील कोणतीही वस्तू तिच्या भावजयांना पटकन देते. ती त्यांच्याशी प्रेमाने वागते.

४. शिकण्याची वृत्ती : मी काही मास स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या आढाव्याला जात होते. तेव्हा सोनाली मला म्हणायची, ‘‘आई, तुला साधनेच्या आढाव्यातून जे शिकायला मिळाले, ते मलाही सांग. मलाही तसे प्रयत्न करता येतील.’’

५. ती मला माझ्या चुका सांगते आणि मी केलेल्या प्रयत्नांचे कौतुकही करते.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा : काही वेळा मला आर्थिक ताण आल्यावर मी सोनालीशी बोलायचे. तेव्हा ती मला म्हणायची, ‘‘आई, आपण श्रीमन्नारायणाच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणांपाशी आहोत. जिथे नारायण आहे, तिथे लक्ष्मीही आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस.’’

– श्रीमती संध्या बधाले (सोनाली यांची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.६.२०२४)