श्री. संकेत पिसाळ यांना धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

श्री. संकेत पिसाळ

१. धर्मप्रेमीने मद्यविक्रीचा व्यवसाय बंद करून चाकरी करणे

‘सोलापूर येथे एका भागामध्ये धर्मशिक्षणवर्ग चालू आहे. एक धर्मप्रेमी तेथील परिसरात प्रसार करायचे आणि ३५ – ४० जणांना वर्गाला आणायचे. त्यांचा मद्यविक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे ते स्वतः वर्गात बसत नसत. पुढे ७ – ८ वर्ग झाल्यावर ते धर्मप्रेमी मला म्हणाले, ‘‘आता माझा मद्यविक्रीचा व्यवसाय चालत नाही.’’ त्यांना मी सांगितले, ‘‘मद्याचा व्यवसाय केल्यामुळे पाप लागते. तुम्ही सेवा केल्यामुळे गुरुकृपेने व्यवसायावर परिणाम झाला. आता तुम्ही चाकरी करू शकता.’’ त्यानंतर त्यांनी चाकरी करणे चालू केले. ते वर्गाला येणारे नवीन धर्मप्रेमी असूनही गुरुकृपेने त्यांना पाप लागणार्‍या व्यवसायातून बाहेर काढले.

२. सामूहिक होळीच्या नियोजनातून धर्मप्रेमींना आनंद मिळणे

सोलापूर येथील बोळकोटेनगर येथे धर्मशिक्षणवर्ग चालू आहे. एकदा वर्गात सामूहिक होळीचे आयोजन केले होते. वर्गात येणार्‍या धर्मप्रेमींना सेवा वाटून दिल्या. धर्मप्रेमींनी स्वतःहून पुढाकार घेऊन पूर्ण गल्लीमध्ये जाऊन सर्वांना होळीचे निमंत्रण दिले आणि त्या ठिकाणी मोठी सामूहिक होळी केली. होळीच्या पूजनानंतर धर्मप्रेमींनी ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेविषयी प्रतिज्ञा घेतली. ही सेवा करतांना धर्मप्रेमींना आनंद मिळाला.’

– श्री. संकेत पिसाळ, सोलापूर (८.४.२०२४)