कोल्हापूर येथील स्वप्नील कारखानीस यांचा स्तुत्य उपक्रम !
मुंबई – सध्या बाजारात शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांच्या वह्यांवर केवळ चित्रपटातील नट-नट्या किंवा महागड्या गाड्या यांची छायाचित्रे असतात. कोल्हापूर येथील स्वप्नील कारखानीस यांनी वह्यांवरील या चित्रांच्या संदर्भात उत्तम उपक्रम राबवला आहे. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या वह्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेका गड-दुर्गाच्या छायाचित्रांसह सविस्तर माहिती दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाविषयी माहिती मिळेल आणि भावी पिढीला गुड-दुर्गांचे संरक्षण आणि संवर्धन यांची आवड निर्माण होईल. (विद्यार्थ्यांना भारताच्या तेजस्वी इतिहासाची माहिती करून देणारे स्वप्नील कारखानीस यांचे कौतुक करावे तेवढे थोडे ! – संपादक)
सौजन्य : Live महाराष्ट्र / न्युज
‘खरेतर प्रत्येक मराठी माणसाने आपापल्या पाल्यांना अशी गड-दुर्गांची माहिती असणारी वही घेऊन द्यायला हवी’, असे आवाहन यु ट्युबवरील व्हिडिओद्वारे (https://www.youtube.com/watch?v=FwJJ71TTjhs या लिंकमध्ये) करण्यात आले आहे. या वह्या मागवण्यासाठी स्वप्नील कारखानीस यांना ७०२८९४२७१२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. यासाठी कुरियर सेवासुद्धा उपलब्ध आहे.