पिंपरी (पुणे) येथे महिला साहाय्यक फौजदाराला मारहाण !

पिंपरी (जिल्हा पुणे) – पिंपरी कॅम्प येथील शगुन चौकामध्ये वाहतूककोंडी सुरळीत करत असतांना विनापरवाना वाहन चालवल्या प्रकरणी एका दुचाकीवर कारवाई करण्यात आली. कारवाई केली याचा राग म्हणून कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला साहाय्यक फौजदाराला मारहाण केली. ‘मीपण तुम्हाला बघून घेतो’, अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी उमाकांत वाघमारे आणि स्वप्नील गाडे या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.