१. ‘टी.व्ही.एस्.’ या आस्थापनाकडून मिळालेला प्रतिसाद !
१ अ. सनातन संस्थेच्या कार्याची माहिती ऐकून प्रभावित झालेल्या ‘टी.व्ही.एस्.’ या आस्थापनाच्या अधिकार्यांनी पंचांगासाठी विज्ञापन देणे : ‘वर्ष २००५-२००६ मध्ये आम्ही चेन्नई येथे सनातनच्या तमिळ भाषेतील पंचांगासाठी विज्ञापने आणि अर्पण मिळवण्याची सेवा करत होतो. तेव्हा आम्ही ‘टी.व्ही.एस्.’ या आस्थापनाच्या त्या वेळच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना भेटलो आणि त्यांना सनातन संस्थेच्या कार्याची विस्तृत माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वार्तांची कात्रणे आणि ध्वनीचित्र-चकती यांच्या माध्यमांतून दिली, उदा. सनातनने देवतांचे विडंबन रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, एम्.एफ्. हुसेन यांनी देवतांचे विडंबन करणार्या काढलेल्या चित्रांच्या विरोधातील मोहीम आणि त्या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद, मोठ्या आस्थापनांमध्ये तणावमुक्तीसाठी घेत असलेली विनामूल्य व्याख्याने, तसेच बालसंस्कारवर्गांमुळे मुलांमध्ये झालेले सकारात्मक पालट इत्यादी. तणावमुक्तीसाठी घेत असलेल्या व्याख्यानांसाठी आस्थापनांकडून मिळालेली प्रशस्तीपत्रेही आम्ही त्या अधिकार्यांना दाखवली. त्यामुळे ते प्रभावित झाले आणि त्यांनी लगेच तमिळ पंचांगासाठी विज्ञापन दिले.
२. ‘गोपुरम् कुंकू’ या आस्थापनाच्या मालकांनी तमिळ, तेलुगु आणि इंग्रजी या भाषांतील पंचांगांसाठी विज्ञापने देणे
आम्ही चेन्नई येथील ‘गोपुरम् कुंकू’ या आस्थापनाच्या मालकांचीही भेट घेतली. त्यांनाही सनातन संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ‘गोपुरम् कुंकू’चे मालक चेन्नई येथील सनातनचे १०५ वे संत पू. पट्टाभिराम प्रभाकरन् (वय ८० वर्षे) यांच्या संपर्कातील होते. त्यांनाही सनातनचे कार्य आवडले. त्यांनी तमिळ, तेलुगु आणि इंग्रजी या भाषांतील सनातन पंचांगांसाठी प्रत्येकी १२ ‘डेट बॉक्स’साठी २४ विज्ञापने दिली. ते आताही तमिळ, तेलुगु आणि इंग्रजी या भाषांतील पंचांगासाठी विज्ञापने देत आहेत.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची कृपा आणि संकल्प यांमुळेच आमच्याकडून ही सेवा झाली’, त्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०२२)