वाढीव आकाराची होर्डिंग न काढल्यास होर्डिंग अनधिकृत ठरवून पाडण्याची पिंपरी-चिंचवड पालिकेची चेतावणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड शहरातील २४ अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यात आली आहेत. महापालिकेने परवाना दिल्यापेक्षा अधिक आकाराचे, तसेच अधिक उंचीवर लावण्यात आलेल्या एकूण ३६५ होर्डिंगधारकांना आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने नोटीस बजावल्या आहेत, तसेच होर्डिंगधारक, होर्डिंगचालक आणि जागामालक अशा ७२ जणांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ७ दिवसांच्या आत नियमानुसार होर्डिंगचा आकार न केल्यास ते होर्डिंग अनधिकृत ठरवून पाडण्यात येईल, असे आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.  महापालिकेने कारवाई चालू केल्यापासून शहरातील अनेक होर्डिंग्जच्या सांगाड्यावरील विज्ञापने काढली आहेत. त्यामुळे केवळ होर्डिंग्जचे लोखंडी सांगाडे राहिले आहेत.