१. मोगर्याच्या झाडाला ३ – ३ च्या गटाने कळ्या येणे, ‘त्या ३ कळ्या म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आहेत’, असे वाटून त्यांना आपोआप नमस्कार केला जाणे
‘आमच्याकडे ३ – ४ मोगर्याची झाडे आहेत. वसंतऋतूचे आगमन झाल्यावर त्यांना बहर येतो. या झाडांचे निरीक्षण करतांना लक्षात आले की, ‘पुष्कळ वेळा मोगर्याच्या कळ्या ३ – ३ च्या गटाने येतात. यातील मध्यभागी असणारी कळी आकाराने मोठी असते आणि बाजूच्या दोन कळ्या आकाराने थोड्या लहान असतात. या कळ्यांची रचना पहातांना माझ्या मनात ‘मध्यभागी असलेली मोठी कळी, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि बाजूला एकाच उंचीवर अन् सारख्याच आकाराच्या असणार्या दोन कळ्या, म्हणजे गुरुमाऊलींच्या चरणांशी बसलेल्या ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आहेत’, असा विचार आला. त्या वेळी त्या कळ्यांना माझ्याकडून आपोआपच नमस्कार केला गेला.
२. गुरुस्मरण होऊन भावजागृती होणे
त्या दिवसापासून झाडावर अशा कळ्या दिसल्या की, ‘मोगर्याच्या तीन कळ्यांच्या रूपातून तीनही गुरु आपल्याकडे पहात आहेत’ असे वाटते आणि गुरुस्मरण होऊन भावजागृती होते.
३. सुगंध येणे
या अनुभूतीचे टंकलेखन करत असतांना खोलीमध्ये अकस्मात् सुगंध येऊ लागला. शेजारी माझे यजमान श्री. मयूरेश बसले होते. त्यांना मी ही अनुभूती टंकलेखन करत असल्याची कल्पनाही नव्हती. त्यांनी मला आणि कु. मोक्षदाला विचारले, ‘‘तुम्हाला सुगंध आला का ?’’ तेव्हा आम्हा दोघींनाही सुगंध येत होता.
ही अनुभूती दिल्यामुळे तीनही गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते आणि ‘त्या मोगर्याच्या सुगंधासारखाच आपल्या कृपेचा सुगंध आमच्याभोवती सतत दरवळत राहो’, अशी मी प्रार्थना करते.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२७.७.२०२१)
|