पू. राजाराम नरुटेआजोबा यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी ठाणे येथील कु. प्रियांका प्रभुदेसाई यांना जाणवलेली सूत्रे

१४.३.२०२२ या दिवशी श्री. राजाराम नरुटेआजोबा संतपदी विराजमान झाले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला या आनंद सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पू. राजाराम नरुटे

१. पू. राजाराम नरुटेआजोबा यांचा संतसन्मान सोहळा होण्यापूर्वी

मला आध्यात्मिक त्रासामुळे चक्कर येण्याचा त्रास आहे. सोहळा चालू होण्याआधी माझ्या मनात त्याविषयी विचार होते. ‘माझ्यावर त्रासदायक आवरण आले आहे’, असे मला वाटत होते. मला जडपणा जाणवत होता.

कु. प्रियांका प्रभुदेसाई

२. पू. राजाराम नरुटेआजोबा यांचा संतसन्मान सोहळा चालू झाल्यावर

अ. सोहळ्याच्या आरंभी (सुश्री (कु.)) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करायला सांगितल्यावर ‘मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले.

आ.  श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा  नीलेश सिंगबाळ सभागृहात आल्यावर मला वातावरणात शक्ती आणि आनंद जाणवला.

इ. पू. नरुटेआजोबा संतपदी विराजमान झाल्याचे घोषित झाल्यावर माझी भावजागृती झाली. कु. मधुरा भोसले (सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी सूक्ष्म परीक्षणात सांगितले, ‘‘आजोबांना संत घोषित केल्यावर त्यांच्यातून भावाची स्पंदने प्रक्षेपित झाली.’’ तेव्हा ‘माझी भावजागृती झाली’, असे नसून गुरुदेव तशी स्पंदने निर्माण करतात. त्यामुळे भावजागृती अनुभवता येते’, असे माझ्या लक्षात आले.

ई. पू. नरुटेआजोबा साधनेविषयी बोलत असतांना मला हलकेपणा आणि पुष्कळ आनंद जाणवला.

उ. ‘व्यासपिठावर असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या चित्रातील श्रीकृष्णही आनंदी झाला आहे’, असे मला वाटत होते.

परात्पर गुरु डॉक्टरच सर्व करतात आणि साधकांना आनंद देतात. गुरुदेवांनी ही आनंदमय भावभेट दिल्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– कु. प्रियांका प्रभुदेसाई, ठाणे, महाराष्ट्र. (१५.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक