स्वातंत्र्यानंतर शाळेमधून धर्मशिक्षण देण्यात न आल्यामुळे देशाच्या सर्व क्षेत्रात नीतीमत्ता कमालीची घसरली आहे. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार वाढला आहे. हे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे ! – संपादक
नवी देहली – केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘सीबीआय’ने) ५० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ‘गॅस अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’चे संचालक (विक्रीवृद्धी) ई.एस्. रंगनाथन यांना अटक केली आहे. ‘खासगी आस्थापनांना पेट्रोरसायन उत्पादने विकतांना सूट देण्याच्या बदल्यात रंगनाथन् यांनी लाच घेतली’, असा आरोप सीबीआयने केला आहे. या प्रकरणी सीबीआयने विविध ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये अनुमाने १ कोटी २९ लाख रुपये रोख, १ कोटी ३ लाख रुपयांचे सोन्याचे आभूषण आणि अन्य मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी सीबीआयने अन्य ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
Gail Director E S Ranganathan arrested by CBI in bribery case #ETIndustryNews https://t.co/d7IAOHDPZb
— ET Industry News (@ETIndustryNews) January 16, 2022
१. सीबीआयने गुन्हा नोंदवल्यानंतर देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील रंगनाथन यांचे कार्यालय अन् निवासस्थान यांसह ८ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
२. सीबीआयच्या एका अधिकार्याने सांगितले की, देहली, नोएडा, गुडगाव, पंचकुला, कर्नाल इत्यादी ठिकाणी आरोपींच्या ठिकाणांचा शोध घेण्यात आला. ज्यात अनुमाने १ कोटी २९ लक्ष रुपये हस्तगत करण्यात आले. छापे टाकल्यानंतर हस्तगत केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम चालू आहे, तसेच या प्रकरणाचे अन्वेषणही चालू आहे.