नामजपाची आवड असलेली आणि मतिमंद असूनही ‘गुरुदेव’ असा उच्चार ऐकताच आनंदी होणारी बेळगाव, नंदीहळ्ळी येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रुती सिद्धाप्पा हलगेकर (वय १५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. श्रुती सिद्धाप्पा हलगेकर ही या पिढीतील एक आहे !

‘आमची मुलगी कु. श्रुती सिद्धाप्पा हलगेकर मतिमंद आहे. तिला बोलता येत नाही आणि काही कळत नाही. ती सतत झोपून असते. तिच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

कु. श्रुती सिद्धाप्पा हलगेकर

१. पूर्वी बोललेले न कळणे आणि आता बोललेल्या गोष्टींचा बोध होणे

वर्ष २०१६ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रुतीची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के असल्याचे घोषित झाले. तेव्हा तिचे वय १० वर्षे होते. त्या वेळी तिला आमचे बोलणे फारसे कळत नव्हते; पण आता आम्ही बोललेल्या गोष्टींचा तिला बोध होतो.

२. मांजर आणि पाळीव कुत्रा यांचा आवाज ओळखून प्रतिसाद देणे

३ वर्षांपासून आम्ही एक मांजर पाळले आहे. ते मांजर ओरडल्यावर श्रुती त्याचा आवाज ओळखते आणि त्याला प्रतिसाद देऊन हसते. ते मांजरही तिच्याजवळ जाऊन बसते. ४ मासांपासून आम्ही एक कुत्राही पाळला आहे. तो भुंकल्यावर श्रुती त्याचा आवाज ओळखून त्याला प्रतिसाद देते आणि हसते.

३. भ्रमणभाषवरील भजन, प्रार्थना आणि श्लोक ऐकून प्रतिसाद देणे

सौ. लक्ष्मी हलगेकर

भ्रमणभाषवर भजन लावल्यावर श्रुती त्याला लगेच प्रतिसाद देते. ‘नंदकिशोरा चित्त चकोरा ।’, हे गीत लावल्यावर प्रत्येक क्षणी तिच्या तोंडवळ्यावरील भाव पालटतात आणि तिची भावजागृती होते. भ्रमणभाषवर ती प्रार्थना, श्लोक आणि कृतज्ञता ऐकते अन् प्रतिसाद देते. मी मोठ्याने नामजप करते. तेव्हा श्रुतीही तोंडाची हालचाल करून नामजप करण्याचा प्रयत्न करते.

४. ‘कृष्ण’ आणि ‘जय गुरुदेव’, असे शब्द कानी पडताच श्रुतीची भावजागृती होणे

अ. ‘कृष्ण’ असा उच्चार केल्यावर श्रुतीची भावजागृती होते.

आ. ‘जय गुरुदेव, जय गुरुदेव’, असे शब्द कानी पडताच ती शांत होऊन ते ऐकते आणि तिची भावजागृती होऊन ती रडू लागते.

५. नामजपाची आवड असणे

अ. श्रुतीला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप पुष्कळ आवडतो. नामजप करतांना ‘गुरुदेव’ असा उच्चार होताच ती मोठ्याने हसते आणि तिला पुष्कळ आनंद होतो.

आ. श्रुती बोटांच्या वेगवेगळ्या मुद्रा करते आणि शांत असते. तेव्हा ‘तिचा नामजप चालू आहे’, असे मला जाणवते.’

– सौ. लक्ष्मी सिद्धाप्पा हलगेकर, राजहंसगड, नंदीहळ्ळी, बेळगाव. (१४.२.२०२१)


बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.