यवतमाळ येथे विलगीकरण कक्षात ६ जण भरती

स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या नागरिकांची संख्या ६ झाली आहे. त्यांपैकी ३ जण कोरोनाबाधित असून उर्वरित ३ जण निगराणीखाली आहेत.

‘होम क्वारंटाइन’ सांगितलेल्यांवर पोलिसांचे ‘व्हॉट्सअ‍ॅप ‘व्हिडिओ कॉल’द्वारे लक्ष

‘होम क्वारंटाइन’ सांगितलेले लोकही घराबाहेर पडून अन्यत्र फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. कल्याण-डोंबिवली पोलीस ‘व्हॉट्सअ‍ॅप ‘व्हिडिओ कॉल’द्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवत आहेत.

कोरोना साथीमुळे नांदापूर (जिल्हा हिंगोली) गावात नवीन व्यक्तींना प्रवेशबंदी

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शहरी भागासमवेतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात असून जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथील गावकर्‍यांनी नवीन व्यक्तींना गावात प्रवेशबंदी केली आहे.

कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी सामाजिक योगदान द्यावे ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

कोरोना विषाणूचा संसर्ग हे जागतिक संकट असून त्याचा संसर्ग थांबवणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक आस्थापन आणि कारखाने यांनी कामगारांना घरी थांबण्याच्या सूचना द्याव्यात.

ठाणे जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांकडून घरपोच पोषण आहाराचे वाटप

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये; म्हणून शाळा-महाविद्यालयांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सध्या बंद आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संबंधित गावांमध्ये घरोघरी जाऊन सेवा देत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणार्‍या १४७ जणांवर गुन्हा नोंद

२१ आणि २२ मार्च या काळात अवैध मद्यविक्री करणार्‍या १४७ जणांवर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. वरील दोन्ही दिवशी ९ लाख ४८ सहस्र ३७४ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.

श्री दासबोध नित्यपाठ म्हणजे श्री समर्थ उपदेशाचे जणू नवनीतच ! – रमणलाल शहा, ज्येष्ठ ज्योतिर्विद

श्री समर्थ रामदासस्वामी यांनी १७ व्या शतकात ‘ग्रंथराज दासबोध’ची निर्मिती केली. या ग्रंथाच्या माध्यमातून श्री समर्थांनी कालातीत असलेला पारमार्थिक आणि प्रापंचिक उपदेश केला आहे. आताच नाही भविष्यातही शेकडो वर्षे दासबोध ग्रंथोपदेश साधकांना मार्गदर्शक ठरणार आहे.

ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथे भाज्यांच्या दरात कमालीची वाढ

ठाणे, कल्याण आणि डोंबिवली पश्‍चिम येथील गुप्ते रस्ता, नवापाडा, सम्राट चौक रोड, उमेशनगर येथे भरवण्यात येणार्‍या बाजारात भाजीपाला आणि फळे यांच्या मूल्यात विक्रेत्यांनी दुपटीने वाढ केली आहे.