मानवाचा संसाराशी तात्कालिक संबंध

ज्याप्रमाणे महासागरात वहात जाणारी दोन लाकडे कधी एकमेकांना भेटतात आणि काही काळाने विलग होतात, त्याप्रमाणे दोन माणसे काही काळासाठी एकत्र येतात आणि कालचक्राच्या गतीने विलग होतात.

आहाराचा मनावर होणारा परिणाम !

आहार पवित्र अथवा अपवित्र असल्यामुळे तो खाल्ल्यामुळे आपले मनही पवित्र अथवा अपवित्र बनते. भोजन करतांना उद्भवणारे मानसिक संस्कार आणि विचारांचे प्रकार यांचा खाल्लेल्या अन्नावर परिणाम होऊन मनाची विशिष्ट स्थिती होते.

महर्षींची साधकांसाठी संदेशसुमने !

साधकांच्या सर्व प्रकारच्या आवश्यकता पूर्ण करणारे प.पू. गुरुदेव ! प.पू. गुरुदेव आहेत, तर आपल्याला कोणत्याच रोगाचे भय नाही. दुर्धर रोगांतही गुरुदेव समवेत आहेत. साधकांच्या भौतिक आणि आध्यात्मिक आवश्यकता पूर्ण करणारे एकमेव प.पू. गुरुदेवच आहेत.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

साधकांनी कंटाळा न करता सतत आध्यात्मिक स्तरावर कठोर साधना केली, तर साधकांच्या जीवनरक्षणासाठी व्यय होणारी संतांची आणि परात्पर गुरुदेवांची शक्ती राष्ट्ररक्षणासाठी वापरली जाऊन ‘ईश्‍वरी राज्य’ लवकर येईल !

हास्यास्पद साम्यवाद !

‘जिथे पृथ्वीवरची सर्व माणसेच नव्हे, तर झाडे, डोंगर, नद्या इत्यादी एकसारखे दिसत नाहीत, तेथे ‘साम्यवाद’ हा शब्दच हास्यास्पद नाही का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

लोका सांगे ब्रह्मज्ञान !

‘राष्ट्र-धर्मासंदर्भात इतरांना ‘काहीतरी करा’, असे शिकवणारे; पण स्वतः काही न करणारे पत्रकार ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥’ या गटात येतात.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

लोकांचे एकमेव ध्येय ‘सुखप्राप्ती’ !

हा सिद्धांत या लोकांपुरताच आहे, असे नसून तिन्ही लोकांनी उपलक्षित होणार्या, चतुर्दश्लोकात्मक सार्या ब्रह्मांडालाच लागू पडणारा आहे.

हास्यास्पद साम्यवाद !

‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ या शब्दाकडे आणि ईश्‍वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

तिसर्‍या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना करा !

भक्ताला म्हणजे साधना करणार्‍यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव तिसर्‍या महायुद्धात वाचवील.’ – (परात्पर   गुरु) डॉ. आठवले  

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

‘आपल्या प्रत्येक कृतीत शिष्यभाव असायला हवा. इतरांशी बोलतांना आपली वाणीही शिष्यभावात असायला हवी, म्हणजेच नम्र असायला हवी. आपल्या वाणीमुळेच दुसर्‍याची वाणी आपल्याला ‘तथास्तु’ म्हणत असते.