पाण्याऐवजी सरबत प्यावे का ?

कधीतरी गंमत म्हणून सरबत प्यायल्यास चालते; परंतु प्रतिदिन सरबत पिण्याची सवय आरोग्याला चांगली नसते. सरबतातून अनावश्यक साखर पोटात जाते. साखर आरोग्याला हानीकारक असते. त्यामुळे सरबताऐवजी साधे पाणीच प्यावे.

पाणी उष्ण (गरम) कि थंड प्यावे ?

‘थंडीच्या दिवसांत उष्ण, तर उष्णतेच्या दिवसांत थंड पाणी प्यावे. थंड, म्हणजे शीतकपाटातील नव्हे. उन्हाळ्यात माठातील (मातीच्या मडक्यातील) पाणी प्यायल्याने मन प्रसन्न होते. अन्य ऋतूंमध्ये माठातील पाणी पिऊ नये. विकार असतांना उकळलेले पाणी कोमट किंवा थंड करून प्यावे.’

पोट साफ होत नसल्यास अधिक वेळा थोडे थोडे पाणी प्यावे

ठिबक सिंचनामध्ये एका वेळी अधिक पाणी न देता थेंब थेंब पाणी दिले जाते. या पाण्याचा झाडाला पुरता उपयोग होतो. त्याप्रमाणे शरिरालाही पुरेसे पाणी मिळावे, यासाठी एकाएकी गटागट पाणी न पिता थोड्या थोड्या वेळाने एकेक घोट प्यावे.

‘दिवसभरात ८ पेले पाणी प्यावे’, हे योग्य आहे का ?

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असल्याने प्रत्येक व्यक्तीची पाण्याची आवश्यकता वेगळी असू शकते. त्यामुळे पाणी किती प्यावे, यासंबंधी स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेण्यापेक्षा ईश्वरी संवेदनेनुसार तहान लागते, तेव्हा थोडे थोडे पाणी प्यावे.’

जेवतांना पाणी प्यावे कि पिऊ नये ?

अन्नाचे योग्य पचन होण्यासाठीसुद्धा ते अधिक घट्ट किंवा पातळ असू नये. त्यामुळे ‘जेवतांना आवश्यकतेनुसार मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी प्यावे’, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

‘शौचाला होण्यासाठी तांब्याभर पाणी पिणे’ ही सवय असल्यास ती मोडावी

पाणी पिऊन शौचाला होण्यापेक्षा जठराग्नी (पचनशक्ती) चांगला असणे महत्त्वाचे आहे. तो चांगला राहिला, तर योग्य वेळी आपणहून  शौचाला होतेच, त्यासह आरोग्यही चांगले रहाते.

सकाळी उठल्याउठल्या भरपूर पाणी पिऊ नये !

चूल पेट घेत असतांना तिच्यात तांब्याभर पाणी ओतले, तर काय स्थिती होईल ? सकाळी उठल्याउठल्या भरपूर पाणी प्यायल्याने जठराग्नीच्या (पचनशक्तीच्या) संदर्भात असेच होत असते. त्यामुळे सकाळी तहान लागेल तेव्हा थोडे थोडे पाणी प्यावे.’

पूर्व किंवा दक्षिण या दिशांना डोके करून झोपावे ! (चार दिशांना डोके करून झोपल्यास होणारे परिणाम)

‘पूर्वेकडे डोके करून झोपल्यास धन, तर दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य प्राप्त होते. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता वाढते, तर उत्तरेकडे डोके करून झोपल्यास हानी किंवा मृत्यू ओढवतो.

ग्रहणकाळात उपवास करण्याने होणारा आध्यात्मिक स्तरावरील लाभ

उपवास केल्यास सुस्ती येत नाही, म्हणजे तमोगुण वाढत नाही. उलट सत्त्वगुण वाढतो. ग्रहणकाळात उपवास केल्याने जो सत्त्वगुण वाढतो, त्याच्यामुळे ग्रहणकाळातील साधना चांगली होते.

इतरांची झोपमोड होणार नाही, याची काळजी घ्या !

‘एखादा माणूस झोपलेला असेल, तर त्याची झोपमोड होऊ देऊ नये.’ अनेकांना याचे भान नसते. दुसरा झोपलेला असतांना मोठ्याने बोलणे, पिशवीचा किंवा अन्य आवाज करणे, तसेच झोपलेल्याला जाग येईल, अशी कोणतीही कृती करणे टाळावे.’