भारत सरकार या हिंदूंसाठी काही करणार का ?

बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये ३० जूनपर्यंत ७९ हिंदूंची मुसलमानांकडून हत्या झाल्याची माहिती ‘बांगलादेश जातिया हिंदु महाजोत’ने दिली आहे. या काळात ६२० लोकांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली, तर १४५ जणांना ठार मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

नूपुर शर्मा यांचा विरोध करणारे आता कुठे आहेत ?

संभल (उत्तरप्रदेश) येथे एका हॉटेलमध्ये तालिब हुसेन हा हिंदूंच्या देवतांची चित्रे असलेल्या वर्तमानपत्रांचा वापर मांस ठेवण्यासाठी करत होता. पोलीस त्याच्याकडे गेल्यावर त्याने पोलिसांवर चाकूने आक्रमण केले.

घुसखोरांना देशाबाहेर हाकला !

गुरुग्रामजवळ (हरियाणा) असलेल्या मानेसर गावात आयोजित पंचायतीने जवळपासच्या सर्व गावांमधील हिंदूंना घुसखोर मुसलमान व्यापारी आणि विक्रेते यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

न्यायालयाचा अवमान कोण करतात, हे जाणा !

तिरुपूर (तमिळनाडू) येथे मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महसूल विभागाने संबंधित अवैध मशिदीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुसलमानांनी येथे ‘रस्ता बंद’ करून नमाजपठण केले.

यावर कोण विश्वास ठेवणार ?

‘दावत-ए-इस्लामी’चे कोणत्याही आतंकवादी कृत्याशी देणेघेणे नाही, असे वक्तव्य या संघटनेचे कराची येथील मुख्यालयातील वरिष्ठ मौलाना महमूद कादरी यांनी केले. कन्हैयालाल यांच्या हत्येच्या मागे ही संघटना आहे, अशी माहिती पुढे येत आहे.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा !

बिहार विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता ‘वन्दे मातरम्’ने होतांना राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सऊद आलम हे त्यांच्या जागेवर बसून होते. ते उभे राहिले नाहीत. याविषयी नंतर ते म्हणाले, ‘‘आपला देश हिंदु राष्ट्र नाही.’’

याविषयी भारत सरकार गप्प का ?

ढाका (बांगलादेश) येथील हाजी युनूस अली स्कूल अँड कॉलेज येथे शिक्षक असणार्‍या उत्पल कुमार सरकार यांना १९ वर्षीय अशराफुल इस्लाम याने क्रिकेटच्या यष्टीद्वारे मारहाण करून त्यांची हत्या केली.

महाराष्ट्र सरकारचे उर्दूप्रेम जाणा !

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या वार्षिक व्ययासाठी राज्य सरकारने वर्ष २०२२-२३ साठी १९ लाख ६० सहस्र रुपयांची तरतूद केली आहे.

काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! 

उदयपूर (राजस्थान) येथे १० दिवसांपूर्वी सामाजिक माध्यमांतून नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट प्रसारित केल्यामुळे कन्हैयालाल तेली या ४० वर्षीय व्यक्तीचा कट्टरतावादी मुसलमानांनी शिरच्छेद केला.

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात अल्पसंख्यांकांची मौज !

महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवत्ताधारक अल्पसंख्य विद्यार्थ्यांकरता वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षात सरकारने १२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील ३ वर्षांच्या एकत्रित निधीच्या तुलनेत हा निधी ५ पट आहे.