भारतातील जिहाद नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

‘जिहादी हे जगातील सर्वांत गरीब आणि श्रीमंत देशांतील नागरिकांचीही हत्या करत आहेत. जगात असा कोणता देश आहे, जिथे जिहादी कारवाया होत नाहीत ?’ –  बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

याविषयी भारत आणि इस्लामी देश गप्प का ?

भारतात पैगंबरांच्या कथित अवमानाच्या विरोधात बांगलादेशातील चितलमारी येथे मुसलमानांनी हिंदूंच्या घरांवर आक्रमण करून त्यांना आग लावली. हिंदूंना त्यांची घरे सोडून अन्यत्र लपावे लागले.

या तालिबान्यांना कारागृहात डांबा !

कोलकाता (बंगाल) येथे ‘आशिया चषक २०२३’च्या फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या वेळी भारताकडून अफगाणिस्तानचा पराभव झाला. यानंतर अफगाण खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना मारहाण केली.

इस्लामी देश आता गप्प का आहेत ?

अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेने गुजरातच्या द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरावर आक्रमण करण्याची धमकी दिली आहे.

अशी मागणी का करावी लागते ?

‘देशात शुक्रवारच्या नमाजानंतर ज्या मशिदींमधून दगडफेक केली जाते, त्या सर्व मशिदींना टाळे ठोकावे’, अशी मागणी वाराणसी येथे काशी धर्म परिषदेने आयोजित बैठकीत करण्यात आली.

हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई कधी करणार ?

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी नूपुर शर्मा यांना अटक करावी, यासाठी शुक्रवारच्या नमाजानंतर देशातील अनेक ठिकाणी मुसलमानांनी हिंसाचार केला.

मुसलमान, भारत आणि इस्लामी देश आता गप्प का ?

पाकमधील कराची येथील कोरंगी परिसरातील श्री मरीमाता मंदिरावर ६ ते ८ जणांनी आक्रमण केले. अन्य एका घटनेत जमावाने कोरंगीमधीलच श्री हनुमान मंदिरावरही आक्रमण करून मूर्तीची तोडफोड केली.

साम्यवाद्यांचा भ्रष्टाचार जाणा !

केरळमधील सोने तस्करीच्या प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेश हिने दंडाधिकाऱ्यांपुढे नोंदवलेल्या तिच्या जबाबामध्ये ‘तस्करीमध्ये केरळच्या साम्यवादी सरकारचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्, त्यांची पत्नी, मुलगी, २ सहकारी, तसेच माजी मंत्री यांचा सहभाग होता’, असे म्हटले आहे.

यांना कारागृहात डांबा !

‘भगवान शिव मनुष्य होते कि दगड ? तेथे शिवाचे लिंग सापडले आहे कि दगड ? शिवलिंग असते, तर ते विरघळले असते’, असे संतापजनक विधान समाजवादी पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते लाल बिहारी यादव यांनी ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगावरून केले आहे.

भारत इस्लामी देशांतील हिंदूंवरील आक्रमणांविषयी गप्प का रहातो ?

नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणारे विधान केल्यावरून कतार, कुवैत, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरेबिया या इस्लामी देशांनी भारताच्या राजदूतांना बोलावून जाब विचारला.