सांगली, २१ ऑगस्ट (वार्ता.) – ऊन, थंडी आणि पाऊस यांची तमा न बाळगता नित्यनियमाने जगाच्या घडामोडी वाचकांपर्यंत पोचवून समाज जागृतीचे काम करणार्या वृत्तपत्र विक्रेत्यांना राखी बांधत त्यांच्याशी बंधुत्वाचे नाते निर्माण करण्याचा अनोखा उपक्रम भाजप महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस अधिवक्त्या सौ. स्वाती शिंदे यांच्या संकल्पनेतून १९ ऑगस्ट या दिवशी करण्यात आला. महाराष्ट्रात प्रथमच भल्या पहाटे ‘वृत्तपत्र वितरण केंद्रा’वर येऊन वृत्तपत्र विक्रेता बांधवांना राखी बांधण्याचा स्तुत्य उपक्रम सौ. शिंदे यांनी स्वत:च्या पदाधिकार्यांसह साजरा केला.
या वेळी ‘महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटने’चे सरचिटणीस विकास सूर्यवंशीसह इतर विक्रेत्यांनी या उपक्रमाविषयी अधिवक्त्या सौ. स्वाती शिंदे यांच्यासह भाजप महिला पदाधिकार्यांचे आभार मानले.