शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांच्या कपाळावर स्वागत म्हणून टिळा लावल्याने मुसलमान पालक संतप्त !

पोलिसांकडे केली तक्रार !

प्रतिकात्मक छायाचित्र (सौजन्य : Hindustan Times)

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील कावल गावातील शासकीय महाविद्यालयात प्रवेशाच्या पहिल्या दिवशी मुसलमान विद्यार्थ्यांच्या कपाळावर टिळा लावण्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या संदर्भात मुसलमान विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्याध्यापकांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत पाठवले.

१ जुलैपासून शाळा आणि महाविद्यालय चालू झाले. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या कपाळावर टिळा लावण्यात आला. जेव्हा मुसलमान विद्यार्थी घरी गेले, तेव्हा पालकांनी टिळा लावण्याविषयी चौकशी केल्यानंतर ते शाळेत पोचले आणि या घटनेचा निषेध केला. यानंतर ते पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी मुख्याध्यापक रणवीर सिंह यांना बोलावून घेतले. मुख्याध्यापक सिंह यांनी टिळा लावण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे पालकांना सांगितले. यापुढे मुसलमानांना टिळा लावण्यात येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर प्रकरण शांत झाले.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंनी गोल टोपी घालावी, अशी मुसलमानांची इच्छा असते. या उलट हिंदूंनी त्यांना टिळा लावला, तर ते त्यांना सहन होत नाही. याचा अर्थ सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता केवळ हिंदूंनी पाळायची, अन्य धर्मियांनी नाही, असाच याच अर्थ होतो. आत्मघाती धर्मनिरपेक्षता पाळणारे हिंदू हे कधी लक्षात घेणार आहेत ?