आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा नोंद !

आमदार विलास पोतनीस

मुंबई – शस्त्रधारी अंगरक्षकासह मतदानकेंद्रामध्ये प्रवेश केल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. ४ जून या दिवशी मतमोजणी चालू असतांना आमदार विलास पोतनीस यांनी मतमोजणी केंद्रात प्रवेश केला. या प्रकरणी शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी निवडणूक अधिकार्‍यांकडे याविषयी तक्रार केली होती. निवडणूक आयोगाकडून देण्यात येणार्‍या ओळखपत्राद्वारेच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जातो. या नियमाला डावलून आमदार पोतनीस यांनी सुरक्षारक्षकासह मतमोजणी कक्षात प्रवेश केला.