दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ५ दिवसांत मुसळधार पाऊस !; नाशिक येथे फळभाज्या आणि पालेभाज्या यांच्या दरात वाढ !…

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ५ दिवसांत मुसळधार पाऊस !

मुंबई – मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील ५ दिवसांत मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही ठिकाणी ‘यलो अलर्ट’ (वादळी पावसाची चेतावणी), तर काही ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ (धोक्याची सूचना) जारी केला आहे.


नाशिक येथे फळभाज्या आणि पालेभाज्या यांच्या दरात वाढ !

नाशिक – येथील बाजार समित्यांमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्या यांची आवक घटल्याने भाजीपाल्यांच्या दरात पुष्कळ वाढ झाली आहे. कोथिंबीर, कांद्याची पात यांचे दरही प्रचंड वाढले आहेत, तसेच हिरवी मिरची, वालपापडी, घेवडा, दोडके, गिलके, कारले आदी भाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. तीव्र उन्हाळा आणि नाशिक जिल्ह्यात अवेळी पडलेला पाऊस यांमुळे शेती पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांमध्ये दरात वाढ झाली आहे.