सातारा जिल्हा प्रशासन विशाल अग्रवाल यांच्या महाबळेश्वर येथील अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या सिद्धतेत !

सातारा, १ जून (वार्ता.) – पुणे येथील कार अपघात प्रकरणातील वेदांत अग्रवाल याचे वडील उद्योगपती विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथे अनधिकृत एम्.पी.जी. रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट सातारा जिल्हा प्रशासन लवकरच सीलबंद करण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली आहे.

कल्याणीनगरमध्ये अपघात झाल्यानंतर विशाल अग्रवाल यांचा महाबळेश्वर येथील अनधिकृत कारभार उघडकीस आला. जिल्हा प्रशासनाने हॉटेलमधील बिअर बार काही दिवसांसाठी बंद केला; मात्र कोणतीही ठोस कारवाई केली नाही.