Mani Shankar Aiyar : (म्हणे) ‘चीनने वर्ष १९६२ मध्ये भारतावर कथित आक्रमण केले होते !’  – काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर

काँग्रेसचे पाकप्रेमी आणि चीनप्रेमी नेते मणीशंकर अय्यर यांचे राष्ट्रघातकी विधान !

काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर

नवी देहली – वर्ष १९६२ मध्ये चीनने भारतावर केलेल्या आक्रमणाला काँग्रेसचे नेते असणारे माजी केंद्रीय मंत्री मणीशंकर अय्यर यांनी ‘चीनचे कथित आक्रमण’ असे म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी अय्यर यांना उपस्थितांनी प्रश्‍न विचारल्यावर यांची लगचेच दिलगिरी व्यक्त केली. येथील ‘फॉरेन करस्पॉडंट्स क्लब’मध्ये ‘नेहरूज फर्स्ट रिक्रूट्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या विधानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. भाजपने या विधानावरून काँग्रेसवर टीका केली आहे.

या सदंर्भात भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान शाखेचे अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, नेहरूंनी चीनमुळे भारताला मिळणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्वावर पाणी सोडले, राहुल गांधी चीनसमवेत गुप्तपणे सामंजस्य करार करतात, राजीव गांधी फाऊंडेशनने चिनी दूतावासाकडून निधी स्वीकारला आणि चिनी आस्थापनांना भारताची बाजारपेठ उघडी केली. आता काँग्रेसचे नेते चिनी आक्रमणाचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनने भारताच्या ३८ सहस्र चौरस मीटर भूमी अवैधपणे नियंत्रण मिळवले आहे.

पक्षाचा अय्यर यांच्या विधानाशी संबंध नाही ! – काँग्रेस

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी मणीशंकर अय्यर यांच्या विधानावर म्हटले की, अय्यर यांनी ‘कथित आक्रमण’ हा शब्द चुकून वापरला होता. त्याबद्दल त्यांनी तात्काळ क्षमाही मागितली. त्यांच्या वयाकडे पाहता त्यांना आपण सूट द्यायला हवी. काँग्रेस पक्षचा त्यांच्या विधानाशी संबंध नाही.

संपादकीय भूमिका

  • मणीशंकर अय्यर सातत्याने राष्ट्रघातकी विधाने करत असतांना काँग्रेस त्यांच्यापासून स्वतःला वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करत असते; मात्र अय्यर यांच्यावर कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या !
  • चीनच्या आक्रमणानंतर संसदेत चर्चेच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी चीनने बळकावलेल्या भारतीय भूमीविषयी म्हटले होते की, ‘तेथे गवतही उगवत नाही.’ यावरून काँग्रेसवाल्यांची मानसिकता लक्षात येते !