परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना कु. अंजली मुजुमले हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना पुणे येथील कु. अंजली मुजुमले (वय १५ वर्षे) हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘२.५.२०२१ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षींनी सांगितल्यानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. त्या सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कु. अंजली मुजुमले

१. जन्मोत्सव सोहळा पहातांना माझी सतत भावजागृती होत होती.

२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या डोलोत्सवाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ परात्पर गुरुदेवांना झोका देत असतांना ‘मीही त्यांना झोका देत आहे’, असा भाव ठेवला. त्या वेळी माझी भावजागृती झाली.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ परात्पर गुरुदेवांच्या चरणी फुले अर्पण करत असतांना ‘त्या फुलांमध्ये मी आहे’, असे मला वाटत होते.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ परात्पर गुरुदेवांची आरती करत असतांना ‘मीही हातात ताट घेऊन त्यांची आरती करत आहे’, असे मला वाटत होते.

५. त्या दिवशी मला सण असल्यासारखेच वाटत होते. ‘हा दिवस मावळू नये’, असे मला वाटत होते.

६. या सोहळ्यातून मला पुष्कळ चैतन्य मिळाले.’

– कु. अंजली मुजुमले (वय १५ वर्षे), सातारा रस्ता, पुणे. (११.४.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक